आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे

कागदपत्रांची यादी

1

१. आधार कार्ड

अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे.

2

२. अधिवास प्रमाणपत्र

प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे खालीलपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल:

  • १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड
  • १५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
3

३. परराज्यातील जन्म असल्यास

महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे खालीलपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र आवश्यक:

  • १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड
  • १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
4

४. वार्षिक उत्पन्न (रु. २.५० लाखापेक्षा कमी)

उत्पन्नाच्या दाखल्याबाबतचे निकष:

  • अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
  • ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
5

५. नवविवाहितेच्या बाबतीत

रेशानकार्डवर नावाची नोंद नसल्यास, विवाह प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

6

६. बँक खाते तपशील

बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे.

7

७. हमीपत्र व फोटो

लाभार्थी महिलेचे हमीपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन ऑनलाइन भरता येतील. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
हमीपत्राचा नमुना योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा अंगणवाडी सेविका आणि सुविधा केंद्रांकडून प्राप्त करता येईल.
तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन आधार लिंक करण्याचा फॉर्म भरून द्यावा लागेल किंवा नेट बँकिंगद्वारे देखील हे करता येते.

सर्व कागदपत्रे तयार आहेत?

जर तुमची सर्व कागदपत्रे तयार असतील, तर तुम्ही पात्रतेचे निकष पुन्हा एकदा तपासा किंवा होम पेजवर जा.

ई-केवायसी पूर्ण केली का?

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

सुरक्षेसाठी नम्र आवाहन

कृपया कोणत्याही फसव्या वेबसाईट किंवा बनावट लिंक्सवर विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत सरकारी पोर्टलचाच वापर करा. लक्षात ठेवा, या योजनेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

सुरक्षित वेबसाइट
फी नाही
अधिकृत वेबसाइट