Ladki Bahin Yojana FAQ Banner - Form Filling Help

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Frequently Asked Questions (FAQ)

1मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे.

या योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांचे स्वावलंबन वाढवणे आणि कुटुंबात त्यांची भूमिका अधिक बळकट करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

2ई-केवायसी (e-KYC) का अपयशी (Failed) होते? / Why e-KYC Failed?

ई-केवायसी (e-KYC) फेल होण्याची काही मुख्य कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:

1
आधार नाव जुळत नाही (Name Mismatch)

तुमच्या अर्जातील नाव आणि आधार कार्डवरील नाव यात फरक असल्यास e-KYC फेल होऊ शकते.

2
मोबाईल नंबर लिंक नसणे (Mobile Not Linked)

तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर OTP येणार नाही, त्यामुळे प्रोसेस पूर्ण होणार नाही.

3
सर्व्हर समस्या (Server Issue)

शासनाचे सर्व्हर डाउन असल्यास e-KYC फेल आणि एरर येऊ शकतो. अशा वेळी थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा.

💡 उपाय (Solution):

समस्या सोडवण्यासाठी आमचे E-KYC Guide पहा.

किंवा तुमचे आधार कार्ड जवळच्या आधार केंद्रावर जाऊन अपडेट करा किंवा बँकेत जाऊन आधार सीडिंग (Aadhaar Seeding) तपासा.

3मोबाईलवरून e-KYC कशी करावी? (How to do e-KYC on Mobile)

तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून e-KYC पूर्ण करू शकता. खालील स्टेप्स फॉलो करा:

  • स्टेप १: अधिकृत वेबसाईटवर जा आणि 'Applicant Login' करा.
  • स्टेप २: मेनूमधून 'Update e-KYC' हा पर्याय निवडा.
  • स्टेप ३: तुमचा आधार क्रमांक टाका आणि 'Get OTP' वर क्लिक करा.
  • स्टेप ४: मोबाईलवर आलेला OTP टाका आणि सबमिट करा.

सविस्तर माहितीसाठी:

पूर्ण प्रोसेस स्टेप-बाय-स्टेप पाहण्यासाठी आमचे E-KYC गाईड (येथे क्लिक करा) वाचा.

4लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती? (ladki bahin official website)

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेची एकमेव अधिकृत वेबसाईट खालीलप्रमाणे आहे:

⚠️ टीप: याव्यतिरिक्त इतर कोणत्याही वेबसाईटवर तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका.

5e kyc लाडकी बहिन योजना महाराष्ट्र म्हणजे काय? (What is e-KYC?)

e-KYC (Electronic Know Your Customer) ही एक डिजिटल ओळख पडताळणी प्रक्रिया आहे.

लाडकी बहीण योजनेमध्ये, तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांशी लिंक आहे की नाही, हे तपासण्यासाठी e-KYC केली जाते. यामुळे लाभार्थ्याची ओळख पटते आणि योजनाचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात सुरक्षितपणे जमा होतात.

थोडक्यात: e-KYC म्हणजे तुम्हीच खरे लाभार्थी आहात याची खात्री करणे.
6योजनेसाठी वयोमर्यादा काय आहे? (What is the age limit?)

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादेच्या अटी खालीलप्रमाणे आहेत:

1
किमान वय (Minimum Age)

अर्ज करणाऱ्या महिलेचे वय किमान २१ वर्षे पूर्ण असावे.

2
कमाल वय (Maximum Age)

अर्ज करणाऱ्या महिलेचे वय जास्तीत जास्त ६५ वर्षे असावे.

💡 टिप: वयाची गणना ही योजनेच्या अधिकृत शासन निर्णयातील (GR) तारखेनुसार केली जाते.

7उत्पन्नाची अट काय आहे? (What is the income criteria?)

योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाच्या उत्पन्नाबाबत खालील अटी आहेत:

1
उत्पन्न मर्यादा (Income Limit)

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

2
रेशन कार्ड सवलत (Ration Card Benefit)

ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही.

सविस्तर माहितीसाठी आमचे पात्रता मार्गदर्शक पहा.

8अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? (What documents are required?)

अर्ज भरताना खालील महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवा:

आधार कार्ड (Aadhar Card)
बँक पासबुक (Bank Passbook)
रहिवासी दाखला / रेशन कार्ड
हमीपत्र (Self Declaration)
पासपोर्ट फोटो
मोबाईल नंबर (आधार लिंक)
9अर्ज कुठे करायचा? (Where to apply?)

तुम्ही खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने अर्ज करू शकता:

📱

नारी शक्ती दूत ॲप

Play Store वरून डाउनलोड करा

🌐

अधिकृत पोर्टल

ladakibahin.maharashtra.gov.in

🏢

सेतू केंद्र / अंगणवाडी

तुमच्या जवळच्या केंद्रावर जा

अर्ज कसा करायचा? स्टेप-बाय-स्टेप माहितीसाठी आमचे अर्ज प्रक्रिया गाईड पहा.

10योजनेचे पैसे कधी जमा होतात? (When will the money be credited?)
📅

१५ तारीख

दर महिन्याला हप्ता जमा होतो

ℹ️साधारणपणे दर महिन्याचला पात्र महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा केले जातात. बँकेच्या सुट्ट्यांनुसार दिवस मागे-पुढे होऊ शकतात.

ℹ️मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पैसे जमा होण्याची तारीख/दिवस शासनाच्या धोरणानुसार वेळोवेळी पुढे-मागे होऊ शकतात.

सुरक्षेसाठी नम्र आवाहन

कृपया कोणत्याही फसव्या वेबसाईट किंवा बनावट लिंक्सवर विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत सरकारी पोर्टलचाच वापर करा. लक्षात ठेवा, या योजनेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

सुरक्षित वेबसाइट
फी नाही
अधिकृत वेबसाइट