आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे

कागदपत्रांची यादी

1

१. आधार कार्ड

अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे.

2

२. अधिवास प्रमाणपत्र

प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे खालीलपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल:

  • १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड
  • १५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
3

३. परराज्यातील जन्म असल्यास

महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे खालीलपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र आवश्यक:

  • १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड
  • १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
4

४. वार्षिक उत्पन्न (रु. २.५० लाखापेक्षा कमी)

उत्पन्नाच्या दाखल्याबाबतचे निकष:

  • अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
  • ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
5

५. नवविवाहितेच्या बाबतीत

रेशानकार्डवर नावाची नोंद नसल्यास, विवाह प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

6

६. बँक खाते तपशील

बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे.

7

७. हमीपत्र व फोटो

लाभार्थी महिलेचे हमीपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो.

सर्व कागदपत्रे तयार आहेत?

जर तुमची सर्व कागदपत्रे तयार असतील, तर तुम्ही पात्रतेचे निकष पुन्हा एकदा तपासा किंवा होम पेजवर जा.

ई-केवायसी पूर्ण केली का?

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

नवीनतम अपडेट्स (Latest Updates)

योजनेबद्दलची सर्वात नवीन आणि महत्त्वाची माहिती येथे वाचा.

सर्व लेख पहा
Ladki Bahin Yojana Payment Solution: ३ महिन्यांचे ४५०० रुपये का रखडले? 'हे' काम करा आणि त्वरित मिळवा लाभ!
लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana Payment Solution: ३ महिन्यांचे ४५०० रुपये का रखडले? 'हे' काम करा आणि त्वरित मिळवा लाभ!

लाडकी बहीण योजनेच्या यादीतून नाव उडाले? ९० लाख महिलांची नावे कापल्याची बातमी खरी आहे का? ३१ मार्च २०२६ च्या मुदतीपूर्वी e-KYC आणि बँक आधार सीडिंग कसे दुरुस्त करायचे, हे जाणून घ्या. तुमचे ४५०० रुपये बुडणार नाहीत, लगेच वाचा!

पूर्ण वाचा
Bank Aadhaar Seeding: बँकेत न जाता मोबाईलवरून स्वतः करा आधार लिंक!
बँक अपडेट

Bank Aadhaar Seeding: बँकेत न जाता मोबाईलवरून स्वतः करा आधार लिंक!

तुमच्या बँक खात्याला आधार लिंक (Aadhaar Seeding) आहे का? सरकारी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घ्या मोबाईलवरून आधार लिंक करण्याची सोपी पद्धत.

पूर्ण वाचा
ladki bahin yojana ekyc correction
e-KYC अपडेट

Ladki Bahin Yojana: e-KYC करताना चूक झाली? टेन्शन घेऊ नका! 'अशी' करा दुरुस्ती आणि मिळवा तुमचे ४५०० रुपये

लाडक्या बहिणींनो, घाईगडबडीत फॉर्म भरताना किंवा e-KYC करताना अनेक महिलांकडून काही चुका झाल्या आहेत. चुकीचा पर्याय निवडल्यामुळे किंवा आधार नंबर चुकीचा टाकल्यामुळे अनेक बहिणींचे पैसे बँकेत आलेच नाहीत.

पूर्ण वाचा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

तुमच्या मनात असलेले काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे:

१. आधार कार्ड, २. बँक पासबुक, ३. रहिवासी दाखला/रेशन कार्ड, ४. हमीपत्र आणि ५. पासपोर्ट फोटो. ही कागदपत्रे अनिवार्य आहेत.

चुकीची eKYC असल्यास हप्ता थांबू शकतो. आधार पडताळणीमध्ये चूक झाल्यास पैसे थांबवले जातात, परंतु दुरुस्ती केल्यावर पुढील हप्ते पुन्हा नियमितपणे सुरू होऊ शकतात.

हप्ता थांबण्याची मुख्य कारणे: eKYC अपूर्ण असणे, फॉर्म Pending किंवा Review मध्ये असणे, माहिती चुकीची असणे किंवा बँक खाते DBT साठी सक्रिय नसणे.

Pending म्हणजे पडताळणी सुरू आहे, आणि Review म्हणजे वरिष्ठ अधिकारी अर्जाची तपासणी करत आहेत. अर्ज Approved झाल्यावरच हप्ता जमा होतो.

नाही, जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. इतरांसाठी २.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला लागेल.

हमीपत्राचा नमुना आमच्या वेबसाईटवर किंवा अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. तो प्रिंट करून, भरून त्यावर सही करावी लागेल.

योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन ऑनलाइन भरता येतील. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.

हमीपत्राचा नमुना आमच्या वेबसाईटवर किंवा अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. तो प्रिंट करून, भरून त्यावर सही करावी लागेल.

तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन आधार लिंक करण्याचा फॉर्म भरून द्यावा लागेल किंवा नेट बँकिंगद्वारे देखील हे करता येते.

सुरक्षेसाठी नम्र आवाहन

कृपया कोणत्याही फसव्या वेबसाईट किंवा बनावट लिंक्सवर विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत सरकारी पोर्टलचाच वापर करा. लक्षात ठेवा, या योजनेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

सुरक्षित वेबसाइट
फी नाही
अधिकृत वेबसाइट