पात्रता निकष
कोण अर्ज करू शकते आणि कोण नाही?
योजनेचे फायदे (Benefits)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला थेट ₹१,५०० म्हणजेच एका वर्षात महिलांना एकूण ₹१८,००० ची मदत मिळते. ही रक्कम महिलांना छोट्या गरजांसाठी उपयोगी पडू शकते . अनेक महिलांसाठी ही मदत मोठा आधार ठरू शकते , सरकारचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा आहे. गावातील तसेच शहरातील अनेक महिलांना या योजनेमुळे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळत आहे. त्यामुळे ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची पायरी मानली जात आहे
पात्रता (Eligibility)
- महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
- राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
- किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
- लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
अपात्रता (Ineligible)
- ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.
- शासनाच्या इतर आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असलेल्या महिला.
- कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार असल्यास.
- कुटुंबातील सदस्य सरकारी बोर्ड/कॉर्पोरेशनचे अध्यक्ष/संचालक असल्यास.
- कुटुंबात चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) असल्यास.
अतिरिक्त महत्त्वाचे नियम
ई-केवायसी अनिवार्य
तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई केवायसी बंधनकारक आहे जर ही प्रक्रिया पूर्ण नाही केली तर पैसे मिळण्यास तुम्हाला अडचण येऊ शकते. तुम्हाला या योजनेचे दर महिन्याला पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी ही अनिवार्य केलेली आहे
बँक खात्याशी आधार लिंक करा
जर तुमचे खाते खूप दिवसापासून बंद असेल किंवा तुम्ही त्याचा वापर करत नसाल व तुमचे खाते आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला DBT मार्फत म्हणजे (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर )पैसे मिळणार नाही तुम्ही एक वेळा तुमच्या बँकेत जाऊन तुमच्या खात्याला तुमचे आधार लिंक आहे किंवा नाही हे पहिले चेक करा जर असेल तर चांगलेच जर नसेल तर तुम्ही ते आवश्यक कागदपत्रे जोडून आधारशी तुमचे खाते लिंक करून घ्यावे.
अचूक व स्पष्ट कागदपत्रे
- Document Scanner - PDF Creator Click Here
- Adobe Scan: PDF Scanner App Click Here
❓ज्या महिला अपात्र आहेत त्यांनी काय करावे?
१. तुमच्या अर्जाचे स्टेटस तपासा: या योजना अंतर्गत तुमचा अर्ज “Pending”, “Rejected” किंवा “Approved” कोणत्या स्थितीत आहे हे तपासणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वात पहिले अधिकृत नारी शक्ती दूत ॲप किंवा शासनाच्या अधिकृत website लॉगिन करा. त्यानंतर अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांकाच्या मदतीने अर्जाचे स्टेटस तपासा. स्टेटसमध्ये अनेक वेळा अर्ज अपूर्ण कागदपत्रे, चुकीची माहिती, आधार लिंक समस्या, बँक खाते पडताळणी न होणे किंवा उत्पन्न प्रमाणपत्रातील त्रुटी यांसारख्या कारणांमुळे तुम्हाला होल्ड किंवा रिजेक्ट झालेला दिसू शकतो. त्यामुळे “Reason” किंवा “Remark” विभाग काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार आवश्यक दुरुस्ती करा. जर कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्याचा पर्याय असेल तर योग्य आणि स्पष्ट दस्तऐवज अपलोड करा. अर्जामध्ये कोणतीही चूक राहू नये यासाठी नाव, बँक खाते, IFSC कोड, आधार नंबर आणि मोबाईल नंबर योग्य आहेत का हे पुन्हा तपासणे आवश्यक आहे.
२. त्रुटी दुरुस्त कशी करावी?.: या फॉर्म मध्ये अनेक महिलांचे अर्ज कागदपत्रांतील छोट्या चुका किंवा अपूर्ण माहितींमुळे बाद झालेले आहेत . त्यामुळे जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल, तर सर्वप्रथम कारण पूर्णता तपासा. त्यानंतर ॲप किंवा वेबसाइटवरील “Edit” पर्याय वापरून चुकीची माहिती दुरुस्त करा व त्यामध्ये जो बदल करावयाचा आहे तो करा . उदाहरणार्थ नाव, आधार नंबर, बँक खाते, IFSC कोड बरोबर तपासून टाका किंवा अपलोड केलेली कागदपत्रे अस्पष्ट असतील ( बरोबर किंवा ब्लर दिसत असतील ) तर ती पुन्हा स्पष्ट करून अपलोड करा. माहिती अचूक भरल्यानंतर अर्ज पुन्हा सबमिट करा, त्यामुळे तुमचा अर्ज पुन्हा पडताळणीसाठी जाऊ शकतो आणि पुढील हप्ते मिळण्याची शक्यता वाढू शकते .
३. मदतीसाठी संपर्क कुठे करावे?: योजने संदर्भात तुम्हाला अर्जातील नेमकी अडचण समजत नसेल त्यामध्ये काही चुका वाटत असतील , तर स्वतः अंदाज लावून दुरुस्त करण्याची चूक करू नका . अशा वेळी तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका, सेतू केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्राला भेट देऊन त्याबद्दल सविस्तर माहिती विचारा . ते तुमचा अर्ज तपासून कोणती माहिती चुकीची आहे, कोणते कागदपत्र पुन्हा अपलोड करावे लागतील किंवा अर्ज पुढे कसा अपडेट करायचा याबद्दल योग्य दिशा व मार्गदर्शन करतील. अनेक वेळा छोट्या तांत्रिक चुका किंवा पडताळणीच्या समस्यांमुळे अर्ज थांबतो, त्यामुळे तज्ञांची मदत घेतल्यास समस्या लवकर सुटू शकते.
माझी लाडकी बहीण योजना
कृपया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुमची पात्रता तपासण्यासाठी खालील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे द्या.
पुढील पाऊल काय?
जर तुम्ही पात्र असाल, तर अर्ज करण्याची प्रक्रिया आणि कागदपत्रे तपासा.
नवीनतम अपडेट्स (Latest Updates)
योजनेबद्दलची सर्वात नवीन आणि महत्त्वाची माहिती येथे वाचा.

Ladki Bahin Yojana May 2026 Installment: मे 2026 चा हप्ता जमा होण्यास सुरुवात, तुमच्या खात्यात पैसे आले का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे 2026 चा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हप्ता मिळाला नाही तर काय करावे, बँक खाते कसे तपासावे, सविस्तर माहिती जाणून घ्या.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026 (PMMVY): गर्भवती महिलांना ₹5,000 लाभ, पात्रता, अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना आर्थिक मदत दिली जाते. योजनेचे फायदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

Ladki Bahin Yojana e-KYC Status Check Online 2026: घरबसल्या e-KYC स्थिती कशी तपासावी?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी e-KYC पडताळणी पूर्ण असणे आवश्यक आहे. घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने आपला Ladki Bahin Yojana e-KYC Status कसा तपासायचा, आवश्यक माहिती, आणि सामान्य समस्यांवरील उपाय सविस्तर जाणून घ्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
तुमच्या मनात असलेले काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे:
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याद्वारे राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. महिलांचे आर्थिक सवलतीकरण आणि पोषण सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
चुकीची eKYC असल्यास हप्ता थांबू शकतो. आधार पडताळणीमध्ये चूक झाल्यास पैसे थांबवले जातात, परंतु दुरुस्ती केल्यावर पुढील हप्ते पुन्हा नियमितपणे सुरू होऊ शकतात.
हप्ता थांबण्याची मुख्य कारणे: eKYC अपूर्ण असणे, फॉर्म Pending किंवा Review मध्ये असणे, माहिती चुकीची असणे किंवा बँक खाते DBT साठी सक्रिय नसणे.
Pending म्हणजे पडताळणी सुरू आहे, आणि Review म्हणजे वरिष्ठ अधिकारी अर्जाची तपासणी करत आहेत. अर्ज Approved झाल्यावरच हप्ता जमा होतो.
महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, वय २१ ते ६५ वर्षांपर्यंत असावे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
पूर्वी फक्त विवाहित महिलांसाठी ही योजना होती, परंतु आताच्या नियमांनुसार २१ वर्षांवरील अविवाहित महिलांनाही काही अटींवर लाभ मिळू शकतो (अद्ययावत माहिती पहा).
नाही, ज्या कुटुंबात कोणीही सरकारी कर्मचारी किंवा आयकर (Income Tax) भरणारे सदस्य आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.